(मुंबई)
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल्या केल्या जात आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सोमवारी (दि. 26) आणि मंगळवारी (दि. 27) पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
राज्यातील 129 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील गणेश जवादवाड, कृष्णदेव खराडे, अमरनाथ वाघमोडे, शंकर अवताडे, संजय तुंगार, अशोक कदम, राम राजमाने, वसंतराव बाबर, श्रीराम पौळ, राजेंद्र निकाळजे, बडेसाब नाईकवाडे, संतोष कसबे, रमेश पाटील या 13 जणांचा समावेश आहे. तर शहरात कन्हैया थोरात, निवृत्ती कोल्हटकर, अंकुश बांगर, अशोक कडलग, नितीन गीते, विजय वाघमारे, संजय गायकवाड, संदीप सावंत, सुहास आव्हाड, प्रमोद वाघ हे पोलीस निरीक्षक शहरात आले आहेत.
राज्यातील 73 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील दिलीप जाधव, विशाल जाधव, अभय दाभाडे, सारंग चव्हाण, सागर काटे, समीर वाघ, स्पृहा चिपळूणकर, तौफिक सय्यद, स्वप्नाली पलांडे, योगेश गायकवाड, राकेश गुमाणे, मंगल जोगन या 12 जणांचा समावेश आहे. शहरात नव्याने सहायक पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आलेली नाही.