भारत स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिन आज साजरा करत आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘हर घर तिरंगा’ मोहीमही मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. लोक घर, कार्यालय आणि वाहनांवर तिरंगा फडकावून ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत आहेत, तर हर्षवर्धन नेवातिया यांनी ‘जय हे २.०’ हे राष्ट्रीय गीत सादर केले आहे. हे गाणे सौम्यजित दास आणि सौरेंद्रो मलिक यांनी संगीतबद्ध केले असून त्यांनीच याचे दिग्दर्शनही केले आहे. या राष्ट्रीय गीतामध्ये ‘भारत भाग्य विधाता’ या गाण्याच्या पाच श्लोकांचाही समावेश आहे.
७५ गायकांनी आपल्या आवाजाने हे गाणे सजवले आहे. हे गाणे आशा भोसले, रशीद खान, एल सुब्रमण्यम, हरिप्रसाद चौरसिया, उदित नारायण, कैलाश खेर, शंतनू मोईत्रा, अरुण साईराम, अनूप जलोटा, कुमार सानू, अलका याज्ञिक, व्ही. सेल्वागणेश, बॉम्बे जयश्री, हरिहरन, हरिहरन यांनी गायले आहे. साधना सरगम, अमजद अली खान, शान, परवीन सुलताना, अजय चक्रवर्ती, शिवमणी, पापोन, शुभा मुद्राल, विश्व मोहन, श्रेया घोषाल, रिदम शॉ, अयान अली बंगरा, अमृत रामनाथ, अंबी सुब्रमण्यम, कौशिकी चक्रवर्ती, अमान अली बंगश, महेश काळे आणि टेटसो सिस्टर्स सारख्या प्रसिद्ध गायकांनी गायले आहे.
अंबुजा नेवातियाच्या यूट्यूब चॅनलवर हे गाणे प्रसारित केले जात आहे. विशेष म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांनी १९११ मध्ये ‘भारत भाग्य विधाता’ हे गीत लिहिले होते. या गाण्यात पाच श्लोक आहेत. या गाण्याच्या पहिल्या श्लोकाला २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली होती.