(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय चाफे या महाविद्यालयाला “सुभाष परेड ” दिनी कणकवली येथे झालेल्या परेडमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. मयेकर महाविद्यालयायाने द्वितीय क्रमांक संपादन केल्याने महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२३ जानेवारी रोजी संपूर्ण देशभर सुभाष दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने कणकवली येथे दळवी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाने ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी ओरसच्या अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांची सुभाष परेड आयोजित केली होती. या परेडमध्ये उत्तम प्रकारचे सादरीकरण करून मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या परेडचे परीक्षण ५८ महाराष्ट्र बटालियनचे पी. आय. स्टाफ ने केले. या परेडमध्ये चाफे महाविद्यालयाचे एकूण 22 कॅडेट्स सहभागी झाले होते.
परेडमध्ये सहभागी झालेल्या सर्व कॅडेट्सचे संस्थेचे सचिव रोहित मयेकर, खजिनदार ऋषिकेश मयेकर, संचालक सुरेंद्र माचिवले,महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा पालये, एनसीसी विभाग प्रमुख सी.टी.ओ. गणेश कुळकर्णी सर्व स्टाफने कॅडेट्सचे खूप कौतुक केले.