सिंधुदुर्गातील कारिवडे येथे धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीने हल्ला चढवत लचके तोडले. या मगरीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लक्ष्मी बाबली मेस्त्री (60) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, गुरुवार 8 डिसेंबर रोजी लक्ष्मी मेस्त्री या कपडे धुण्यासाठी कारिवडे धरणाजवळ गेल्या होत्या. त्या सायंकाळी उशिरापर्यंत घरी आल्या नाहीत म्हणून मेस्त्री कुटुंबीयांसह वाडीतील ग्रामस्थांनी शोधाशोध केली. मात्र शुक्रवारी सकाळी धरणाच्या पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांसह गुराख्यांनी तो पाहिला. या घटनेची माहिती पोलीस व वनखात्याला दिल्यानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले. त्यानंतर हा हल्ला मगरीने केला असल्याचे लक्षात आले. मृतदेह बाहेर काढताना मृतदेहाच्या आजूबाजूला मगरींचा वावर असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले.
पोलीस अधिकाऱ्यांनी वनविभागाला कळवताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, मगरीने या महिलेच्या अंगाचा काही भागाचे लचके तोडण्याचे दिसून आले.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !