(संगमेश्वर/ प्रतिनिधी )
कोकणातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या चित्र-शिल्प कलामहाविद्यालयाच्या वतीने प्रत्येकवेळी नव – नविन शैक्षणिक उपक्रम राबवून मुलांच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळेल यासाठी प्रयत्नशील असते. या मधून कलाविद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या अनेक संधी मिळाव्यात हा या मागचा प्रार्थमिक उद्देश असतो.यासाठी चित्रकार शिल्पकारांची प्रात्यक्षिके, प्रदर्शने, शैक्षणिक सहल, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. यातूनच सायली कदम हिने जिल्हास्तरीय पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे .
दरवर्षी २६ जून हा दिवस जगभर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो.यावर्षी सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे व सावर्डे पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पोस्टर डिसाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विरोधी दिन हा विषयी देण्यात आला होता. या विषयावर विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ठ पोस्टर तयार करून आणली होती. यातून तीन क्रमांक काढण्यात आले.कु.सायली दिनेश कदम -प्रथम,कु.ईशा संदीप राजेशिर्के-द्वितीय क्रमांक ,कु. तुळशी सुरेश भुवड -तृतीय क्रमांक मिळवून यांनी यश संपादन केले आहे.
या पारितोषिक वितरण प्रसंगी सावर्डे पोलीस ठाण्याचे जयंत गायकवाड – सहाय्यक पोलीस निरीक्षक, विनोद आंबेरकर- पोलीस अंमलदार, मोहिते मॅडम, गयरे मॅडम तसेच कोकणचे जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, प्राचार्य. माणिक यादव, प्राद्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच यामधून निवडलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड करण्यात आली. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक कलाकारांनी या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला होता.यामधून कु. सायली कदम हिच्या चित्राची निवड करणात आली. दि.१५ ऑगस्ट रोजी पोलीस दल रत्नागिरी येथे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तिला मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी पोलीस विभागातील अनेक पदाधिकारी निरीक्षक, उपनिरीक्षक उपस्थित होते.
सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के , सौ. पूजाताई निकम, कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव यांनी यशस्वी कलाकारांचे आणि मार्गदर्शक प्राध्यापक वर्गाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.