( मुंबई )
राज्य विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे 22 आमदारांचे शिष्टमंडळ 12 दिवसांच्या युरोप दौऱ्यासाठी काल (गुरुवार) मुंबईतून रवाना झाले. या दौऱ्यात हे शिष्टमंडळ युरोपमधील फ्रॅंन्कफर्ट (जर्मनी), ॲमस्टरडॅम (नेदरलँड) आणि लंडन (यु.के.) या शहरांना भेट देऊन तेथील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील भाजप, शिवसेना (शिंदे गट), अजित पवार गट, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांचा या अभ्यास दौऱ्यात समावेश आहे. 24 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंतच्या युरोप दौऱ्यावर निघालेल्या एकूण 22 आमदारांमध्ये 11 महिलांचा समावेश आहे. दौऱ्याच्या कालावधीत 3 युरोपीय देशांच्या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अभ्यासदौऱ्यावरील शिष्टमंडळाचे नेतृत्व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे करणार आहेत.
दौऱ्यात सहभागी झालेले आमदार
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, उदयसिंह राजपूत, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, मनीषा चौधरी, मोनिका राजळे, विद्या ठाकूर, अश्विनी जगताप, उमा खापरे, सीमा हिरे, सुमन पाटील, माणिकराव कोकाटे, सुनील शेळके, अशोक पवार, मनोहर चंद्रिकापुरे, अमित झनक, अभिजित वंजारी, सुलभा खोडके, प्रज्ञा सातव, संग्राम थोपटे आणि धीरज लिंगाडे यांचा समावेश आहे.