( संगमेश्वर )
संगमेश्वर पोलिस ठाणे येथे महाराष्ट्र दिनी कर्तव्यदक्ष व उत्कृष्ट सेवा बजावलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा काही नागरिकांनी सन्मान केला.
यावेळी व्यासपीठावर मान्यवर म्हणून प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण देशमुख, सहायक पालिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शेट्ये आदी उपस्थित होते.
यावेळी देशात शहीद झालेल्या जवान व पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संगमेश्वर पोलिस ठाण्यातील गेली ३० वर्षे पोलिस दलात सेवा बजावलेले व उत्कृष्ट कामगिरी अशा कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांना पोलिस महासंचालक पदक प्राप्त झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यांच्या वतीने प्रमोद शेट्ये यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
पोलिस दलातील अंमलदार व उत्कृष्ट कबड्डीपटू सचिन कामेरकर हे सध्या गावागावातील व खेडापाड्यातील नवोदित खेळाडू निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर यांच्या वतीने अर्चिता कोकाटे यांच्या हस्ते गौरवण्यात आले..
सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण देशमुख यांची गेल्या दीड वर्षात चांगली कामगिरी पाहता कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून सामाजिक कार्यकर्ते विशाल रापटे यांच्या वतीने त्यांना प्रसाद सदलग यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महिलांसाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या अर्चिता कोकाटे (अमृता शेट्ये, रा. नावडी पागाळी) यांना जनार्दन शिरगावकर यांच्या वतीने प्रवीण देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी गुप्त पोलिस अंमलदार किशोर जोयशी, पोलिस अंमलदार ड्रायव्हर अजय मोहिते, नावडी बीट अंमलदार श्री. पंढेरे, कर्मचारी वृंद यांना पोलिस मित्र आकाश शेट्ये यांनी पुस्तक देऊन संजय शिंदे व विशाल रापटे यांच्या हस्ते सन्मानित केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, पोलिस, होमगार्ड उपस्थित होते.