(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत तालुकास्तरीय पोषण पंदरवडा कार्यक्रम शनिवारी (दिनांक १ एप्रिल २०२३ ) नावडी ग्रामपंचायत येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ए.बा.वि.सेवा.योजना प्रकल्प अधिकारी श्रीमती वंदना यादव तसेच पर्यवेक्षिका सौ नरोटे मॅडम, सौ पेजे मॅडम, सौ कांबळे मॅडम, सौ रावणाग मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन करून शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे प्रकल्पाकडून स्वागत करण्यात आले. प्रमुख मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यानंतर पोषण पंदरवडा कार्यक्रमाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी विविध घोषणा देत रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये किशोरी गरोदर माता, स्तनदा मातांसह सेविका मदतनीस, मान्यवर, ग्रामस्थ, पालक, ज्येष्ट नागरिक देखील उपस्थित होते.
Rh संगमेश्वरच्यावतीने सौ अर्पिता शेट्ये यांच्या कडून HB कॅपचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेकांनी आपली HB तपासणी करून घेतली. पोषण पंदरवडा कार्यक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धा तसेच विविध तृणधान्य वापरून पाककला स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी नावडी ग्रामपंचायत उपसरपंच श्री. विवेक शेरे, ग्रा. प. सदस्य श्री. अभिजित चोचे, ग्रामविकास अधिकारी श्री संजय शेलार, ग्रामसंघ अध्यक्ष सौ. प्रिया सावंत, बचतगट crp सौ. वेदिका मुरकर, बचतगट सदस्य सौ. नयना शेठ्ये, सौ सुप्रिया कदम, पत्रकार दिनेश अंब्रे तसेच अं.सेविका व मदतनीस आशासेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. किशोरी मुली गरोदर माता स्तनदा माता या देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मालती होडे यांनी केले.