(फुणगूस / एजाज पटेल)
संगमेश्वर शास्त्री पूल येथील डी के बॅटरी सर्व्हिस दुकान मागच्या बाजूने फोडून त्यातील 22 बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. या बॅटऱ्यांची किंमत सुमारे 60 हजार रुपये असून बॅटऱ्या चोरी प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात सुरेंद्र सुरेश डिके राहणार तुरळ डिकेवाडी यांनी फिर्याद दिली आहे.
संगमेश्वर कसबा शास्त्रीपुल येथे डी के बॅटरी सर्व्हिस नावाचे चार चाकी व दुचाकी वाहनांचे बॅटरी खरेदी विक्रीचे दुकान आहे. दि 8 ऑगस्ट ते ९ ऑगस्ट दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानाच्या मागील बाजूस भिंतीतील सिमेंट लोखंडी खिडकी कोणत्यातरी साधनाने उचकटवून काढून त्या वाटे दुकानात प्रवेश केला होता व चार चाकी व दुचाकी सुमारे 60 हजार किमतीच्या बॅटऱ्या चोरून होत्या. अशी फिर्यादी दिली होती. या दिलेल्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत होते.
याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करत प्रसाद विलास साळवी (वय 25 राहणार परटवणे) याला अटक केली. त्याच्याकडून काही बॅटऱ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बॅटऱ्या चोरी प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असून याप्रकरणी आणखी काही आरोपी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याबाबत अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत शिंदे करीत आहेत.