(संगमेश्वर)
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वीजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे गावाची दाणादणा उडवली आहे. सडेवाडी, मधलीवाडी, जोगलेवाडी येथील सुमारे 55 घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांचे पत्रे, कौले, गोठयांची छपरे उडाल्याने गुरेही जखमी झाली आहेत. आंबा, काजूची झाडे उन्मळून पडली आहेत तर 10 ते 15 विद्युत पोल तुटून पडले आहेत. व्हिडिओ पाहिल्यावरच वार्याचा वेग किती आहे तो दिसून येतो. या वार्याच्या वेगाने अंगावर अक्षरशः थरकाप उडवणारा आहे.
नारडुवे गावचे सरपंच कृष्णा जोगले म्हणाले की, काल नारडुवे गाव येते मुसळधार पावसाने आमच्या गावातील 50-55 घरांची वाताहात झाली आहे. सडेवाडी, मधलीवाडी, जोगलेवाडी येथील घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झालंय. कुणाच्या घराचं, कुणाच्या गोठ्याच तर कुणाच्या गायी गुरांच नुकसान झालंय. झाडे उन्मळून पडली आहेत. वीज खांब कोसळले. काल पासून आम्ही ग्रामस्थ अंधारात आहोत. आज सकाळपासून आम्ही कामाला सुरुवात केली आहे. एवढं मोठं नुकसान होऊनही शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले नाहीत. त्यांनी या ठिकाणी येवून पाहणी करावी आणि त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.
या ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
विजय भिकू मुदगल, झिलू सोनू लांबाडे, गोविंद रत्ना मुदगल, रामचंद्र कृष्णा मुदगल, दत्ताराम गंगाराम लांबाडे, दिलीप तानू लांबाडे, संतोष धोंडू जोगले, शंकर भागा मुदगल, सप्नील गणपत मुदगल, रामचंद्र सोमा मुदगल, रंजित रमेश मुदगल, सुरेश सोमा मुदगल, बाब्या सखाराम मुदगल, नरेश रामचंद्र मुदगल, संजय धोंडू कांबळे, सुनिल अर्जुन मुदगल, मोहन भिकू मुदगल, आनंदी सखाराम मुदगल, भिकू सोमा जोगले, मनोहर तानु जोगले, आनंदी भिकू जोगले, अनिल गोविंद कांबळे, अनिल काशीनाथ चांदीवडे, रामचंद्र यशवंत जोगले, अर्जून मुदगल, शांताराम गंगाराम मुदगल, कृष्णा भागा मुदगल, अनंत बारकु मुदगल, संदिप सखाराम चांदीवडे, रघुनाथ पांडुरंग चांदीवडे, चंद्रकांत बाबाजी जोगले, शांताराम भिकाजी जोगले, गंगाराम रामा जोगले, सुरेश रामा जोगले, सुरेश भिकाजी घडशी, दिलिप सोनू मुदगल, भिकाजी गणपत चांदीवडे, सुरेश गणपत चांदीवडे, गजानन यशवंत मुदगल, संदिप बारकु कांबळे, संतोष रामचंद्र मांडवकर व जोगलेवाडीतील घरे या व्यक्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.