राजापूर : तालुक्यातील सागवे विभागातील रिफायनरी समर्थक शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांनी पुन्हा एकदा शिवसेनेला जोरदार दणका दिला आहे. या विभागातील शिवसेनेच्या निष्ठावान महिला कार्यकर्त्या व जिल्हा परिषद सदस्या शिवसेनेच्या माजी महिला तालुका आघाडीप्रमुख सौ. लक्ष्मी शिवलकर, सागवेचे माजी सरपंच विद्याधर राणे यांसह शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी सोमवारी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.
तर सध्या ज्या परिसरात रिफयानरी प्रकल्प प्रस्तावित आहे त्या गोवळ ग्रामपंचायतीच्या संरपचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करत सोमवारी भाजपामध्ये जाहिर प्रवेश केला. भाजपाचे नेते देशाचे सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांची केंद्रीय मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल राजापूर भाजपाच्या वतीने अशा प्रकारे शिवसेनेला दणका देत ना. राणे यांना अनोखी भेट देण्यात आली. गोवळ सह कात्रादेवी, गोठीवरे, घोडेपोई, मिठगवाणे, बुरंबे, येथील रिफायनरी समर्थक शिवसैनिकांनी यावेंळी भाजपाचा झेंडा हाती घेतला.
भाजपाचे प्रदेश चिटणीस व कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, तालुकाध््यक्ष अभिजीत गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल गुरूमाऊलीच्या सभागृहात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रवेशकर्त्या लक्ष्मी शिवलकर यांसह प्रवेशकर्त्यांचे भाजपामध्ये स्वागत करण्यात आले.
राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला गेल्या महिन्यांपासून समर्थन वाढत असून शिवसेनेतूनच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक या प्रकल्पाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी यापुर्वी सागवे विभागाच्या शिवसेनेच्या जिल्हापरिषद सदस्या सौ. लक्ष्मी शिवलकर, तद्कालिन विभागप्रमुख राजा काजवे यांसह शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाचे समर्थन केले होते. त्यावर शिवसेनेने पक्षविरोधी भुमिका घेतल्याने सौ. शिवलकर, काजवे यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टीची कारवाई केली होती. मात्र त्यानंतर शिवसेनेच्या विकास विरोधी भुमिकेला कंटाळून राजा काजवे यांसह शेकडो शिवसैनिकांनी काही दिवसांपुर्वीच भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर आता याच विभागातील शिवसेनेच्या एक निष्ठावान महिला कार्यकर्त्या आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. लक्ष्मी शिवलकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विद्याधर राणे यांसह अनंत गुरव, अरुण गुरव, साहिल गुरव, निखील गुरव, बापू गुरव, यशवंत गुरव, सुभाष गुरव, सुरेश गुरव, संदीप गुरव, सुंदर गुरव, दिनेश गुरव, महेश गुरव, प्रणय गुरव, प्रदीप गुरव, केतन गुरव, संजय गुरव, संकेत गुरव, प्रशांत गुरव, ओंकार गुरव, मयुरेश गुरव, शंकर गुरव, सुशांत गुरव, प्रविण गुरव, प्रकाश गुरव, ओमकार गुरव, सुशमा गुरव, अनुष्का गुरव, सानिका गुरव, स्मिता गुरव, करिष्मा गुरव, दिशा गुरव, मानसी गुरव, योगिता गुरव, मनिषा गुरव, प्रतिक्षा गुरव, सुरेखा गुरव, वैभव मेस्त्री, विनायक कुवेसकर, परेश गिरकर, विजय सकपाळ, गणेश कुलकर्णी, सुजय वास्कर, वैभव पवार, मनिष मेस्त्री, सिध्देश राजे, अवधूत जाधव, प्रज्योत खांडेकर, अक्षय जामसांडेकर, सूर्यकांत पुजारी, महादेव येरम, दत्तात्रय मेस्त्री, कृष्णा येरम, सिध्देश येरम, रवळनाथ शिवलकर, रोहन मयेकर, संदीप मयेकर, विनायक मयेकर, गिरीश वाघधरे, संकेत मयेकर, मच्छिंद्र शिरसेकर, अमेय मयेकर, गुरुप्रसाद मयेकर, जितेंद्र वाघधरे, सागर मयेकर, विद्याधर मयेकर, सुरेंद्र मयेकर, समीर मेस्त्री, दिनेश चव्हाण, मंदार कांबळी, प्रविण सुर्वे, प्रविण खांबल, मंगेश घाडी, संजय जोशी, अरुण गुरव, महेश बोटले, विशाल तांबे, बापू घाटे, प्रकाश पाटकर, शिवराम सागवेकर, सुशिल तांबे, साहिल गुरव आदींसह शेकडो शिवसैनिकांनी कात्रादेवी, गोठीवरे, घोडेपोई, मिठगवाणे, बुरंबे, येथील रिफायनरी समर्थक शिवसैनिकांनी यावेंळी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे.
तर सध्या ज्या बारसू, सोलगाव व गोवळ परिसरात रिफायनरी प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. त्या गोवळ ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजीत कांबळे, उपसरपंच प्रिया रोकडे आदीसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनीही विकासासाठी रिफायनरीचे समर्थन करत भाजपात प्रवेश केला. यामध्ये प्रशांत गुरव, संतोष गुरव, प्रज्ञा गोखले, समिधा कातळकर, जयवंत गुरव, गोपाळ पिठलेकर, अंकुश घाडी, प्रकाश पळसमकर, रविंद्र कदम, तेजस भाटले, सायली मयेकर, विश्वनाथ सोगम, सोनल भाटले, विनायक बंडबे, विनायक जोशी, अविनाश जोशी, राकेश जोशी आदींसह शेकडो कार्यकर्त्याचा समावेश आहे.
स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत शिवसेनेची सत्ता असतानाही व शिवसेनेचे आमदार व खासदार असतानाही तालुक्याच्या शैक्षणिक, आरोग्य या सर्वांगिण विकासाबरोबरच बेरोजगार तरूणांना नोकरी देण्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आणि भविष्यात रिफायनरीसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य व शैक्षणिक सेवा सुविधा निर्माण व्हाव्यात आणि बेरोजगार तरूणांच्या हाताला काम मिळावे यासाठी विकासाची भुमिका असलेल्या भाजपात प्रवेश करत असल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांनी केले तर सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस अॅड. सुशांत पवार यांनी केले.
या प्रसंगी कार्यक्रमांमध्ये लक्ष्मी शिवलकर, विद्याधर राणे, व गोवळ गावचे सरपंच अभिजीत कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी आंम्ही भाजपात प्रवेश करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, महिला तालुकाध्यक्ष सौ. श्रुती ताम्हनकर, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अमजद बोरकर, तालुका उपाध्यक्ष फैयाज नाटेकर, दीपक बेंद्रे, माजी नगरसेवक विलास पेडणेकर, पंढरीनाथ आंबेरकर, राजा काजवे, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष जब्बार काझी, कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर, युवा अध्यक्ष उत्तम बिर्जे, अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य मारुती कांबळे, सहकार आघाडी जिल्हा संयोजक अनिल कुमार करंगुटकर, जिल्हा कार्यकारणी सदस्या सौ. शितल पटेल,महिला तालुका सचिव शितल रहाटे, ओबीसी महिला तालुका अध्यक्षा अनिता पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य सौ. अनुजा पवार, सौ. दिलनवाज वस्ता, सौ. रेणुका गुंडये, अरवींद लांजेकर, प्रसाद पळसुलेदेसाई, सुनिल भणसारी, प्रसन्न दाते, बाळ दाते, अमर वारिशे, संतोष धुरत आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.