( खेड / प्रतिनिधी )
कोकणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क वर्गातील नगरपरिषदेच्या नागराध्यक्षाना खासगी वाहन वापरण्याची कायद्यात तरतूद नसतानाही खेड नगरपरिषदेच्या नागराध्यक्षांनी स्वतःच्या खासगी वाहनात लाखो रुपयांचे इंधन भरून नगरपरिषद नियमांचा भंग आणि शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी खेडचे माजी नागराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या विरोधात खेड पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकार यांनी खेड पोलिसात फिर्याद दिली असून १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या दरम्यान हा अपहार झाल्याचे फिर्यादीत नमूद कारण्यात आले आहे.
शासकीय निधीतून वाहनासाठी खर्च केला जात असेल तर एक लॉगबुक ठेवून त्या लाँगबुकमध्ये गाडी किती किलोमीटर फिरली, कुठे कुठे फिरली, कोणत्या कामासाठी फिरली याचा पूर्ण तपशील ठेवायचा आहे. हा शासनाचा नियम आहे. मात्र ज्या मुदतीत हा अपहार झाल्याचा आरोप आहे त्या मुदतीत असे कोणतेही लॉगबुक ठेवण्यात आलेले नव्हते . त्यामुळे खासगी वाहन किती किलोमीटर फिरली, कुठे कुठे फिरले, कोणत्या कामासाठी फिरली याचा काहीही तपशील उपलब्ध नाही त्यामुळे ही शासनाची फसवणूक असून आशाकिय निधीचा अपहार आहे.
खेड नगरपरिषदेतील इंधन घोटाळा तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी माहितीच्या आधारे उघडकीस आणला होता. हा संपूर्ण इंधन घोटाळा ५ लाख १५ हजार ४७९.रुपये आणि ९१ पैसे इतका आहे. हा घोटाळा उघड झाल्यावर तत्कालीन शिवसेना नगरसेवकांनी तत्कालीन गटनेते प्रज्योत तोडकरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून इंधन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी या प्रकारांची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा सह आयुक्त यांच्याकडे सादर केला होता.
दरम्यान गुन्हा दाखल होताच माजी नगराध्यक्ष यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतील असून त्यांना या प्रकरणी अटक पूर्व जमीन मिळाला की नाही याबाबत अद्याप माहित मिळाली नाही.