शनी प्रदोषच्या दिवशी करा हे विधी, उपाय, घरात येईल सुख समृद्धी.
☑️ हिंदू धर्मात प्रदोष व्रताला महत्वाचं स्थान आहे. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीच्या तिथीला हा व्रत केला जातो. यादिवशी भक्त महादेवाची पुजाअर्चा करतात. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेव पार्वतीची पुजा केली तर मनोकामना पूर्ण होतात. यावेळेसचा प्रदोष व्रत शनीवारी येतो आहे, त्यामुळे शास्त्रांमध्ये त्याला शनी प्रदोष व्रत म्हटलं जातं. प्रदोष व्रत कुठल्या दिवशी येतो त्यावरुन त्याचं महत्व वाढतं. यावेळेस महादेव पार्वतीसोबत शनीदेवाचाही आशीर्वाद मिळणार.
☑️ शनी प्रदोष व्रताच्या दिवशी पुजापाठ केल्यानं ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांना संतान प्राप्ती होऊ शकते. यादिवशी तिळाचा भोग लावा. गरीबांना अन्नदान करा. चला बघुया शनी प्रदोष व्रताच्या दिवशी काय केलं म्हणजे घरात सुख समृद्धी येते.
पूर्ण होतात.
2.आजच्या दिवशी कास्याच्या भांड्यात तिळाचं तेल टाकून त्यात चेहरा बघितल्यानंतर दानधर्म केला पाहिजे.
त्यामुळे घरात सुख समृद्धी राहील.
3. शनीला प्रसन्न करण्यासाठी काळे उडीत वाहत्या पाण्यात सोडून द्या.
4. यादिवशी काळे कपडे दान केल्यानं शनी देवाची कृपा कायम रहाते. सोबतच घरात धन आणि यशाचा योग कायम रहातो.
5. यादिवशी पुजा केल्यामुळे शनीची साढेसाती आणि शनी दोषांपासूनही मुक्तता मिळते.