(रत्नागिरी)
शहरातील शिवाजीनगर या मध्यवर्ती आणि उच्चभ्रू ठिकाणी दोन तरुणींच्या सहाय्याने वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या संशयिताला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरुवार २० जुलै रोजी अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीत सोमवारी १ दिवसाची वाढ करण्यात आली.
राजेंद्र रमाकांत चव्हाण (४५, रा. मिरजोळे जांभूळफाटा, रत्नागिरी) असे पोलिस कोठडीतील संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
सोमवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली. या प्रकरणात राजेंद्र चव्हाणच्या अन्य साथीदारांचा तसेच याठिकाणी येणाऱ्या शौकीनांच्या मुळाशी जाण्यासाठी शहर पोलिसांकडून त्याठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करण्यात येणार आहे. संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास कसून करीत आहे.