(धरमशाळा)
यंदाच्या विश्वचषकातील दुसरा मोठा उलटफेर झाला आहे. दुबळ्या नेदरलँडने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तान संघाने गतविजेत्या इंग्लंडचा पराभव केला होता. आज नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला आहे. याआधी २०२२ च्या टी २० विश्वचषकात नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. आता आणखी एकदा दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेचा तीन सामन्यातील पहिला पराभव होय. यंदाच्या विश्वचषकातील नेदरलँडचा हा पहिला विजय होय. याआधी त्यांना दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. नेदरलँडने दिलेल्या २४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २०७ धावांपर्यंत मजल मारु शकला.
नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला आहे. या विश्वचषकातील हा दुसरा मोठा उलटफेर आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात दोन्ही डावांतून प्रत्येकी सात षटके कमी करण्यात आली. अशा परिस्थितीत 43 षटकांच्या या सामन्यात नेदरलँडने प्रथम फलंदाजी करताना आठ विकेट गमावून 245 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 42.5 षटकांत केवळ 207 धावाच करू शकला.
एकदिवसीय विश्वचषक 2023 इंग्लंडपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा संघही उलटफेरचा बळी ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. आफ्रिकेचा या विश्वचषकातील तीन सामन्यांतील हा पहिलाच पराभव आहे. याआधी या संघाने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते.
246 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही काही खास नव्हती. 36 धावांवर पहिली विकेट पडली. डी कॉक 20 धावा करून बाद झाला. यानंतर बावुमा 16 धावांवर बाद झाला. मार्कराम एक धावा करून बाद झाला तर डसेन चार धावा करून बाद झाला.दक्षिण आफ्रिकेची चौथी विकेट 44 धावांवर पडली.यानंतर क्लासेन आणि मिलरने पाचव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी करून काही आशा उंचावल्या, पण क्लासेन बाद झाल्यानंतर मिलर एकाकी पडला. क्लासेन नऊ धावा करून बाद झाला. यानंतर मिलरही 43 धावा करून बाद होताच दक्षिण आफ्रिकेचा पराभव निश्चित झाला.
कोटझे 22 धावा करून बाद झाला. रबाडाने नऊ धावा केल्या. अखेर केशव महाराज आणि लुंगी एनगिडीने संघाची धावसंख्या 207 धावांपर्यंत नेली. मात्र, असे असतानाही संघाला 38 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. नेदरलँड्सकडून लोगन व्हॅन बीक याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर बास द लीडे, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे आणि पॉल व्हॅन मीकरेन या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कुलीन एकरमन याने 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने 43 षटकात आठ गडी गमावून 245 धावा केल्या. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात नेदरलँडची सुरुवात खराब झाली. निम्मा संघ 82 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतर कर्णधार एडवर्ड्सने तळाच्या फलंदाजांसोबत उत्कृष्ट भागीदारी करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.
पावसामुळे बराच वेळ वाया गेल्याने हा सामना 43-43 षटकांचा करण्यात आला होता. दोन्ही डावातून सात षटकं कमी करण्यात आले होती. हा सामना 43-43 षटकांचा असल्यानं पहिला पॉवरप्ले एक ते नऊ षटकांचा, पुढील पॉवरप्ले 10-35 षटकांचा आणि अंतिम पॉवरप्ले 36-43 षटकांचा होता. तीन गोलंदाजांना जास्तीत जास्त नऊ षटकाची तर दोन गोलंदाजांना जास्तीत जास्त आठ षटकांची मर्यादा होती.
नेदरलँड्सकडून कर्णधार चार्ल्स एडवर्ड्सने 69 चेंडूत नाबाद 78 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. याव्यतिरिक्त व्हॅन डर मर्वेने 19 चेंडूत 29 आणि आर्यन दत्तने 9 चेंडूत नाबाद 23 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. जेराल्ड कोएत्झी आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.