राज्यात सुरु असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणा बाबतीतला विषय भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांनी लावून धरला होता. यावेळी सत्ताधारी आघाडी सरकारच्या विधानसभा अध्यक्षांच्यासमोर वेलमध्ये घोषणाबाजी केली. तेव्हा तालिका अध्यक्षांनी भारतीय जनता पार्टीच्या या १२ आमदारांचे एक वर्षा साठी निलंबन केले होते.
तरी आघाडी सरकारने हे निलंबन रद्द करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाच्यावतीने वेगवेगळी निदर्शने केली जात आहेत. आज चिपळूण येथे ही भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने उपविभागीय आधिकारी यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल महोदय यांना निवेदन देऊन हे निलंबन रद्द करण्याची मागणी केली. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रामदासजी राणे, चिपळूण तालुकाध्यक्ष विनोदजी भोबस्कर, चिपळूण शहराध्यक्ष आशिषजी खातू, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.संतोषजी मालप, जिल्हा चिटणीस परिमलजी भोसले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिपाशेठ देवळेकर, शहर सरचिटणीस मधुकरजी निमकर, युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रभंजनजी पिंपुटकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.