( वास्तू )
ज्योतिष शास्त्रानुसार घरातील अनेक चुकीच्या गोष्टींमुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. वास्तुशास्त्रानुसार पुढील चार वस्तू घरात ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन पैशाती कमतरता भासत नसल्याचे मानले जाते.
1. घोड्याची नाल- घोड्याच्या नालवर लिंबू मिरची लावून घराच्या दाराच्या मध्यभागी लटकवा. असं केल्यानं घराला कोणाची नजर लागत नाही, असे म्हणतात. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.
2. विंड चाइम- घरात विंड चाइम लावल्यानं सकारात्मक ऊर्जा राहते. त्याचा थेट परिणाम आपल्या नशिबावर होतो. विंड चाइममुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि देवी लक्ष्मी वास करते.
3.चिनी नाणी- फेंगशुईमध्ये चिनी नाणी अतिशय शुभ मानली जातात. असे मानले जाते की घरात लाल फितीमध्ये अशी तीन नाणी बांधून ठेवल्यास घरातील नकारात्मकता दूर होते. तीन नाणी त्रिभुवनाचे प्रतीक मानली जातात. हे तीन देवींचे प्रतीक मानली जातात
4. लाफिंग बुद्धा – पैशांची थैली धरून ठेवलेला लाफिंग बुद्धा घरात ठेवणं खूप शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्धाची मूर्ती अडीच इंचांपेक्षा मोठी नसावी. लाफिंग बुद्धाला आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं.