(रत्नागिरी)
वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी तालुका महासचिव मुकुंद यशवंत सावंत यांच्या मातोश्री सुजाता यशवंत सावंत यांचे आज (शुक्रवार) दिनांक २८ जुलै २०२२ रोजी दुपारी ०२:४५ वा. अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर उद्या अंतिम दाह संस्कार विधी उद्या, दिनांक २९ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता त्यांच्या राहत्या गावी मौजे वळके पाली येथे होणार आहेत. कालकथित मातोश्री सुजाता यशवंत सावंत यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन बहिणी, दोन नातवंडे असा परिवार आहे.
मुकुंद सावंत यांच्या मातोश्रींच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व स्तरातून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. कालकथित मातोश्री सुजाता यशवंत सावंत यांना दोन सुपुत्रापैकी मोठे सुपुत्र प्रमोद यशवंत सावंत हे भारतीय सैन्य दलात देशसेवा करत आहेत, तर दुसरे सुपुत्र मुकुंद सावंत हे व्यवसायिक असून सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात कार्य करत असतात. अर्थात दोन्ही सुपुत्र देशासाठी आणि समाजाच्या हितासाठी कामं करीत आहेत. आणि या त्यांच्या सामाजिक राजकीय, धार्मिक सांस्कृतिक आणि देशसेवेच्या कार्यात त्यांच्या मातोश्रींचे नैतिक आणि मानसिक पाठबळा शिवाय अशक्य होते.