(चिपळूण /ओंकार रेळेकर)
लोटे परशुराम औद्योगिक संघटनेच्या वतीने दरवर्षी औद्योगिक वसहतींमधील कंपनीच्या कामगारांना व अधिकाऱ्यांना गुणवंत कर्मयोगी, उत्कृष्ट व्यवस्थापक व सुरक्षा अधिकारी या पुरस्कारानी गौरविण्यात येते. यामध्ये उत्कृष्ट, शिस्तबद्ध, वर्तणूक व सुरक्षित काम, तसेच त्याचे सामाजिक काम यावर भर देवून पारितोषिक देण्यात येते. यावर्षीचा गुणवंत कर्मयोगी पुरस्कार घरडा केमिकल लि. लोटेचे संकेत देवरूखकर यांना देण्यात आला.
माजी सनदी अधिकारी श्री इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. देवरूखकर हे घरडा कंपनी मध्ये गेले १६ वर्षे काम करीत असून आजवर त्यांच्या कामाने त्यांना कंपनी मध्ये ही सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ते रोटरी क्लब लोटे या जागतिक सामाजिक संघटनेचे सदस्य आहे, यापूर्वी ते सचिव व कोकण झोन अध्यक्ष या पदावर काम केलेले आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते अग्रेसर असतात, मॅराथॉन स्पर्धा ही प्रथम त्यांच्या संकल्पनेतून लोटे मध्ये सुरू झाली. आजवर त्यांनी Midc मधील अनेक कंपनीच्या होणाऱ्या दुर्घटनेत स्वतःहून पुढे जावून आग विजविणे व कंट्रोल करणे, मटेरियल व माणसांना सुरक्षित विलगिकरण करणे. यात मोलाचं सहभाग दर्शवला आहे, त्यांच्या याच कामाचा विचार करीत लोटे परशुराम औद्योगिक संघटनेने त्यांना सन्मानित केले.
यावेळी डॉ प्रशांत पटवर्धन अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा फेडरेशन, राज आंब्रे अध्यक्ष, कुंदन मोरे सचिव, प्रांताधिकारी सौ राजश्री मोरे मॅडम हे उपस्थित होते.