(खेड / भरत निकम)
तालुक्यातील टाटा प्रोजेक्टच्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने निधन झाले आहे. ही घटना दि. ७ रोजी सायंकाळी ५.४० सुमारास घडली. कैलास सदा ( वय ४६, राहणार बिहार ) असे त्या मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे.
हा कामगार दि. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास कंपनीतील कर्मचारी वसाहतीच्या शेजारी रस्त्याने चालत जात होता. त्यावेळी तो चक्कर येऊन जमिनीवर पडला होता. त्याला नजीकच्या लवेल येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यानी घोषित केले. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.