(डिजि टेक)
आजकाल चांगला बॅटरी बॅकअप देणारा स्मार्टफोन असणं खूप आवश्यक असतं. काही काळाने नियमित चार्जिंगमुळे नवीन स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये देखील समस्या येऊ लागतात. फोन वेगानं डिस्चार्ज होऊ लागतो. त्यामुळे मोठ्या बॅटरी बॅकअपसाठी फोनच्या बॅटरीची काळजी घेणंही आवश्यक आहे. अनेक लोकांच्या फोनची बॅटरी दिवसभरही टिकत नाही. लोकांना दिवसातून दोन दोन वेळा फोन चार्ज करावा लागतो. आपल्याही फोनची बॅटरी लवकर संपते का? याचे काय कारण असावे असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या बॅटरीची लाईफ वाढवू शकता.
बॅटरी हेल्थ कमी झाल्यामुळे कमी बॅटरी लाइफ मिळते. म्हणजे कमी बॅटरी हेल्थ असलेल्या फोनची बॅटरी वेगानं डाउन होऊ लागेल. त्याचबरोबर तुम्हाला फोन गरम होण्यासारख्या समस्यांचा देखील रोज सामना करावा लागेल. पुढे अँड्रॉइड फोनची बॅटरी हेल्थ चेक करण्याच्या पद्धतीची माहिती देत आहोत.
फोनची बॅटरी हेल्थ कशी चेक करायची?
अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये बॅटरी हेल्थ चेक करण्याचा बिल्ट इन मॉनीटर मिळत नाही. त्यामुळे बॅटरी हेल्थ बाबत अँड्रॉइड युजर्सना काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, त्यामुळे त्यांच्या अँड्रॉइड स्मार्टफोनच्या बॅटरी हेल्थची माहिती मिळेल.
सेटिंग मेन्यूच्या मदतीनं
अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये बॅटरी स्टेटस सेटिंग मेन्यूमध्ये जाऊन चेक करू शकता. सेटिंग मेन्यूमध्ये नेव्हिगेशन ऑप्शन तुमच्या अँड्रॉइड बिल्ड आणि व्हर्जननुसार वेगवेगळा असू शकतो. तुमच्या सेटिंग अॅपमध्ये बॅटरी ऑप्शनमध्ये जा. बॅटरी सेक्शनमध्ये तुम्हाला तीन डॉट आयकॉनवर क्लिक करावे लागेल, इथे तुम्हाला बॅटरी युसेज (Battery Usage) वर क्लिक करावा लागेल. इथे तुम्ही त्या अॅप्सची लिस्ट बघू शकता जे चार्जमधून सर्वात जास्त पावर कंज्यूम करत आहेत. तुम्ही हे अॅप्स इथून फोर्स क्लोज करू शकता. वेगवेगळ्या कंपन्यांच्या फोनमध्ये हा ऑप्शन वेगवेगळा असेल.
डायल कोडच्या मदतीनं
खूप कमी लोकांना अँड्रॉइड फोनमधील कोड डायल करून डाग्नोस्टिक मेन्यू अॅक्सेस करता येतो. पुढे आम्ही तुम्हाला अँड्रॉइड स्मार्टफोनची बॅटरी इंफॉरमेशन चेक करण्याचा कोड सांगत आहोत. Phone अॅपच्या मदतीनं *#*#4636#*#* डायल करा. एक टेस्टिंग मेन्यू पॉप अप होईल. इथे तुम्हाला बॅटरी इंफॉरमेशन डिटेल्स जसे की चार्ज लेव्हल, बॅटरी टेम्परेचर आणि हेल्थबाबत माहिती मिळेल. जर तुम्हाला डायल कोडमधून बॅटरी इंफॉरमेशन दिसत नसेल तर तुमच्या कंपनीसाठी कोड वेगळा असू शकतो.
थर्ड पार्टी अॅप्स
वर सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून फोनच्या बॅटरी हेल्थची माहिती मिळाली नसेल तर डीप अॅनालिसीससाठी AccuBattery सारख्या थर्ड पार्टी अॅप्सची मदत घेऊ शकता. या अॅपमधून तुम्हाला बॅटरी युसेज इन्फॉर्मेशन, बॅटरी कपॅसिटी, टेम्परेचर आणि अन्य माहिती मिळते. थर्ड पार्टी अॅप्सच्या मदतीनं बॅटरी हेल्थ चेक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
गुगल प्ले स्टोरमधून AccuBattery अॅप डाउनलोड आणि इंस्टॉल करा. अॅप इंस्टॉल झाल्यानंतर तुम्ही अॅप उघडताच तुम्हाला चार्जिंग, डिस्चार्जिंग, हेल्थ आणि हिस्ट्री चार टॅब दिसतील. हेल्थ टॅबवर क्लिक करा. इथे तुम्हाला फोनची बॅटरी हेल्थ पर्सेंटेज मिळेल. तसेच अन्य माहिती जसे की बॅटरी कपॅसिटी, बॅटरी वीयर सारखी माहिती देखील तुम्हाला दिसेल. महत्वाची बाब म्हणजे या अॅपमध्ये पहिल्यांदाच संपूर्ण डेटा दिसत नाही. अँड्रॉइड थर्ड पार्टी अॅप्ससह बॅटरीची संपूर्ण माहिती शेयर करत नाही. हा डेटा बॅटरी चार्ज आणि डिस्चार्जनुसार गोळा केला जातो.
सॅमसंगच्या फोन युजरसाठी
जर तुमच्याकडे सॅमसंगचा फोन असेल तर तुम्हाला ही माहिती सहज मिळेल. सॅमसंगच्या फोनमध्ये Samsung Members अॅप प्री-इंस्टॉल मिळतो. याच्या मदतीनं सहज फोनची बॅटरी चेक करू शकता.
मोबाईल फोनच्या बॅटरीचे लाईफ अशा प्रकारे वाढवा :
फोनचे व्हायब्रेशन
तुम्ही जर फोनचे व्हायब्रेशन मोड ऑन ठेवले असेल तर तुमच्या फोनमध्ये बॅटरीची समस्या असू शकते. कारण रिंग टोनच्या तुलनेच व्हायब्रेशन जास्त बॅटरी वापरते. अनेक जण टायपिंग आणि टचसाठी ही व्हायब्रेशनचा वापर करतात. यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपू शकते. तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी जास्त काळ टिकवण्यासाठी फोनचे व्हायब्रेशन मोड ऑफ करा.
हे फिचर्स बंद करा
अनेक जण, ब्लूटूथ, GPS, Wifi, Mobile Data सारखे फिचर्स ऑन ठेवतात. हे फिचर्स जास्त बॅटरी वापरतात. जे फिचर्स तुम्ही वापरत नाही ते लगेचच बंद करा. हे फिचर्स तुमच्या फोनची बॅटरी जास्त वापरतात त्यामुळे फोनची बॅटरी वाचवण्यासाठी हे फिचर्स ऑफ करा.
ऑटो सिंक करा ऑफ
Gmail, Twitter, What’s App सारखे Apps आपण सतत वापरतो. हे Apps सतत रिफ्रेश होत असतात. ज्यामुळे युझर्सना लेटेस्ट अपडेट मिळत राहतात. परंतु या Apps मुळे जास्त बॅकेंड डेटा असल्याने फोनची बॅटरी कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे यापैकी कोणते Apps तुम्ही वापरत नसाल तर ते लगेचच बंद करा. त्यानंतर गूगल अकाऊंट आणि ऑटो सिंक ऑप्शन्स देखील बंद करा.
ऑलवेज ऑन डिस्प्ले करा बंद
जर तुम्ही ऑलवेज ऑन डिस्प्ले फिचर वापरत असाल तर तुमच्या फोनची बॅटरी सामान्य वापरापेक्षा जास्त वापरुन लवकर संपेल. या फिचरमुळे आपल्याला फोनवर येणारे महत्त्वाचे डिटेल्स लगेचच कळतात पण यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे फोनची डिस्प्ले सेटिंग्ज लगेचच ऑफ करा.