(पुणे)
रुग्णवाहिका ही रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी असते. मात्र पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये गाडी मागे घेताना एका रुग्णवाहिकेने वृद्ध व्यक्तीचा जीव घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील बस स्थानकाच्या परिसरात डुंबरवाडी येथील टोलनाक्यावर ही घटना घडली आहे. या अपघातानंतर वृद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हि संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Pune Video : रुग्णांचा जीव वाचविणाऱ्या रुग्णवाहिकेनेच घेतला वृद्ध व्यक्तीचा जीव pic.twitter.com/bT5EyYW0Th
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 10, 2023
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील बस स्थानकात एक वृद्ध प्रवासी उभा होता. त्याचवेळी एक रुग्णवाहिका पार्किंगमधून बाहेर पडत होती. रुग्णवाहिका चालकाने स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशाला गाडी मागे घेताना एकदा चिरडलं. मात्र हा प्रकार लक्षात न आल्याने रिव्हर्स घेताना पुन्हा चिरडलं. यानंतर त्याच रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांने जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेलं. परंतु उपचारादरम्यान त्या वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रज्जाक मुंढे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. रुग्णवाहिका चालकावर कारवाई करावी अशी मागणी मृत व्यक्तींच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.