(संगलट-खेड/इक्बाल जमादार)
रिलीफ फौंडेशनच्या इफ्तार गेट टुगेदर च्या कार्यक्रमात हॅंडीकॅप रेल्वे प्रवाशांना आवश्यक असणारी व्हीलचेअर प्रांताधिकारी राजश्री मोरे व तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या हस्ते व मान्यवरांचे उपस्थित रेल्वे अधिकारी रफिक नांदगावकर यांचेकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी रिलीफ फाऊंडेशनचे सिकंदर जसनाईक, हनिफ घनसार, उद्योजक शमीम तांबे, खेड तालुका काँग्रेस अध्यक्ष गौसभाई खतीब, कोरेचे अधिकारी रफिक नांदगावकर, भारतीय स्टेट बँक खेड चे अधिकारी दानियल सांगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रिलीफ फाऊंडेशन हे गरजूंना मदतीचा हात पुढे करण्यात सदैव पुढे असते. युनिक फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकीतून समाजोपयोगी असा स्तृत्य उपक्रम राबवून सामाजिक हित जोपासण्याचे काम रमजान ईदच्या पवित्र महिन्यात केले आहे, ही बाब कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन प्रांतअधिकारी राजेश्री मोरे व तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी करून अशा समाजोपयोगी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
फोटो : युनिक फाऊंडेशनच्या वतीने रेल्वेमधील अपंग प्रवाशांसाठी आवश्यक व्हीलचेअर रेल्वेचे अधिकारी रफिक नांदगांवकर यांचेकडे सुपूर्द करताना प्रांताधिकारी राजश्री मोरे, तहसिलदार प्राजक्ता घोरपडे व सिकंदर जसनाईक, हनिफ घनसार, उद्योजक शमीम तांबे, गौसभाई खतीब आदी मान्यवर दिसत आहेत