(हिंगोली)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. पण लोकांनी त्यांची खरी प्रतिमा काय आहे, हे सांगण्यासाठी आम्हाला केवळ रस्त्यावर उतरावे लागले, असे विधान भारत जोडो यात्रेनिमित्त महाराष्ट्रात दाखल झालेल्या कन्हैया कुमार यांनी केले आहे. ‘राहुल गांधींबद्दल लोक नको ते बोलले. त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींची खरी प्रतिमा पाहायला मिळेल, असेही कन्हैय्या यांनी म्हटले.
कन्हैया म्हणाले की, जेव्हा यात्रा सुरू झाली, तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता की लोक येतील का, एवढे चालतील का? पण या प्रवासाचे ६० दिवस कसे निघून गेले हे सर्वांना कळलेच नाही. दरम्यान देशाला अशा यात्रेची गरज होती. मात्र या यात्रेला जेवढं कव्हरेज मिळायला हवे होते, तेवढे टीव्ही माध्यमांवर दाखवले गेले नाही. मिडीयाने दाखवले नाही, प्रचार केला नाही तरी भारत जोडो यात्रा अभूतपूर्व प्रतिसादात सुरू आहे हे देशातील जनतेला माहीत असल्याचेही कन्हैय्या यांनी नमूद केले.