(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुका गुरू रविदास विकास मंडळाचे वतीने राष्ट्र गुरू रविदास महाराजांची जयंती नियोजित गुरू रविदास भवन जाकादेवी रत्नागिरी येथे रविवार दिनांक ०५ मार्च २०२३ रोजी साजरी होणार आहे. या वेळी राष्ट्रीय रविदास परिषदेचे राज्य अध्यक्ष संतोष खोपकर, कोंकण प्रदेश अध्यक्ष डॉ. एस.व्ही. कदम तसेच जिल्हा अध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर उपस्थित राहणार आहेत.
या वेळी सकाळी 10 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रतिमा पूजन होणार आहे मान्यवरांचे स्वागत, उपस्थितांचे मनोगत, राष्ट्र संत गुरू रविदास यांच्या जीवनावर आधारित मनोगत प्रख्यात वक्ते श्री. संजय बैकर सदर करणार आहेत. दुपारी अल्पोपहार व तदनंतर महीलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्रकाश खेडेकर, उपाध्यक्ष जगन्नाथ फणसोपकर, सचिव दत्ताराम मेढेकर, सहसचिव सचिन चव्हाण व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.