(लांजा)
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) कोकण विभाग रत्नागिरी-सिंधुदुर्ग निरीक्षकपदी चेतन दळवी यांची निवड करण्यात आली आहे. चेतन दळवी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. युवक चे प्रदेश सरचिटणीस म्हणून ते कार्यरत आहेत. पक्षाने चेतन दळवी यांच्यावर पुन्हा एकदा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या कोकण विभाग रत्नागिरी-सिंधुदुर्ग निरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याबाबत बोलताना चेतन दळवी यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर विश्वास ठेवणाऱ्या युवकांना जास्तीत जास्त संघटना रत्नागिरी – सिंधुदुर्गमध्ये अधिक कशी मजबूत करता येईल यावर माझा अधिक भर असेल. येणाऱ्या काळात ज्या काही निवडणुका रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व विधानसभा तसेच लोकसभेत आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून उभी करुन माझ्या सर्व सहकार्यांना सोबत घेऊन मजबूत करण्याचा प्रयत्न माझा राहील.