मंडणगड तालुक्यातील कोव्हीड ग्रस्तांना उपचार मिळावेत यासाठी तालुक्यातील खाजगी वैद्यकीय व्यवसाईकांचे सहकार्याने भिंगळोली येथील बहुउद्देशीय इमारतीत सुरु करण्यात आलेले विघ्नहर्ता कोव्हीड सेंटर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळेच उभे राहीलेले असल्याचे माजी आमदार संजय कदम यांनी सांगितले.
कोव्हीड सेंटर सुरु करण्यासाठी सामाजीक कार्यकर्ते महेश गणवे यांच्या माध्यमातून मुलभुत सुविधा, बेड्स,गाद्या, सँनिटायझऱ, औषधे,रुग्णांना वाफ घेण्यासाठी व्हेपरायझर स्ट्रीमर मशीन या सोबतच ऑक्सीजन उपलब्ध करुन देण्यात आला आहे. असे असताना विद्यमान आमदार आपल्या स्थानीक कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरुन अपुऱ्या माहीतीच्या आधारे न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला. हे कोव्हीड सारख्या विषाणू संसर्गाच्या व आजाराने लोकांचे जीव जात असलेल्या काळात प्रेताचे टाळुवरील लोणी खाण्यासारखेच आहे. यावेळी बोलताना संजय कदम पुढे म्हणाले बहुद्देशीय केंद्राची इमारत व त्यासाठी लागणाऱ्या निधीची पुर्तता मी आमदार असताना जिल्हा नियोजनचे माध्यमातून तत्कालीन राज्यशासनाच्या मंजुरीने करण्यात आली आहे. असे असताना उद्घाटनाचे नाम फलकावर विद्यमान खासदार सुनील तटकरे व विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांचा कुठलाही नोमोलेख न करता शिवसेना पक्षातील पक्षीय पदाधिकाऱ्यांची नावे पाटीवर टाकण्यात आली आहेत. म्हाप्रळ आंबेत जेटी उद्घाटनाचे नाम फलक घटनेवर खासदारांवर हक्क भंग आणण्याचे सुतोवाच करणाऱ्या विद्यमान आमदार योगेश कदम यांनी स्वतःहा केलेल्या कृतीमुळे इतरांचा हक्क भंग झाला आहे याची जाणीव नाही असा टोला लगावीला.
विद्यमान आमदार कोरोनाच्या दोन्ही लाटेत मतदार संघातून गायब आहेत ते कोणता आढावा घेतात त्यांनाच माहीत आहे. मतदार संघातील लोक आजाराने मरत आहेत, लसीचा तुटवडा आहे,लसीकरण अभियान संथगतीने चालु आहे, कोव्हीड रुग्णालयात विविध साधनसामुग्रीचा अभाव आहे या संदर्भात लोकप्रतीनिधी या नात्याने ते कधी लक्ष देणार आहेत असा प्रश्न उपस्थित करताना दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे फुकटेच श्रेय लाटण्याचे काम करीत आहेत. कोरोना व निसर्ग काळात तालुक्यातील जनता समस्यांग्रस्त आहे त्यांचे प्रश्न सोडवणे गरजेेचे आहे असे ते म्हणाले.*
यावेळी तालुका अध्यक्ष मुझ्झफऱ मुकादम, मंडणगड जिल्हा परिषद सदस्य व ओबीसी सेलचे सचिव श्री प्रकाश शिगवण, मंडणगड शहराध्यक्ष श्री.वैभव कोकाटे,पंचायत समिती सदस्य श्री.नितीन म्हामुणकर, उद्योजक श्री.दीपक घोसाळकर, डॉ.आशिष जाधव, डॉ.अक्षय पाटणकर, श्री.हरेश मर्चंडे, सर्फराज चिपोलकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोबीन परकार, श्री.इम्रान महाडीक व कार्यकर्ते उपस्थीत होते.*
विघ्नहर्ता कोव्हीड रुग्णालयास राष्ट्रवादीच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या साहीत्यांचे लोकार्पण करताना माजी आमदार संजय कदम व राष्ट्रवादी कार्यकर्ते.