(रत्नागिरी)
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा रत्नागिरीतर्फे विविध प्रलंबित व न्यायिक मागण्यांसाठी आज दि. २७ मे रोजी केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय मागणी दिन पाळण्याचा आणि निदर्शने करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये रिक्त पदे, कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी, महागाई रोखणे, खासगीकरण विरोध, कामगारविरोधी कायदे रद्द करणे तसेच वीज मंडळ, बॅंकिंग क्षेत्र, जीवनविमा योजनांचे खासगीकरण करू नका, वाढती महागाई रोखून सार्वजनिक वितरण सेवा मजबूत करा, कामगार कायद्यात केलेल्या सुधारणा तत्काळ मागे घ्या, आदी आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.