(राजापूर)
राजापूर तालुक्यातील सोल्ये फणसवाडी येथील युवा सामाजिक कार्यकर्ता सुनील दशरथ मोंडे (32) याचे शुक्रवारी आकस्मिक निधन झाले. सुनील याच्या अकाली निधनाबद्दल पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुनिल मोंडे अत्यंत मनमिळावू व सामाजिक जाण असलेला तरूण होता. गावातच राहून तो मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. गावच्या सामाजिक व विकासात्मक घडामोडीत त्याचा सक्रीय सहभाग असे.
पंचक्रोशी ग्रामविकास समितीने त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याच्या पश्चात आई वडिल, मोठा भाऊ, विवाहीत बहिणी असा परिवार आहे.