(रत्नागिरी)
शहरातील साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्र येथे अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आल़ा. ही घटना सोमवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास स्थानिकांच्या निदर्शनास आल़ी. घटनेची खबर संजय गंगाराम खेत्री (34, ऱा खडपेवठार रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत दिल़ी.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 मार्च 2023 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्र येथे अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल़ा. मृताचे वय अंदाजे 52 वर्ष असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आह़े. मृताच्या अंगात जांभळ्या रंगाचे फूल स्वेटर, जांभळ्या रंगाची फूल पॅन्ट परिधान केलेली आह़े. मृताची अद्याप ओळख पटलेली नसून मृताबाबत कुणाला काही माहिती असल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.