(रत्नागिरी/प्रतिनिधी)
रत्नागिरीत आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. शहरालगतच्या शिरगांव घडशीवाडी येथे एका 43 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सचिन गणपत घडशी (43, ऱा शिरगांव घडशीवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन याला दारूचे व्यसन होत़े. गुरुवार 8 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सचिन याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. तो राहत्या घराच्या वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळून आला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.