(रत्नागिरी/प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून शुक्रवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिबिराला नागरिक व पत्रकार यांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याची माहिती तालुका अध्यक्ष आनंद तापेकर यांनी दिली.
या शिबिराच्या प्रसंगी परिषदेचे राज्य प्रतिनिधी जान्हवी पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण देवरुखकर, ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र नाचणकर, जिल्हा कार्याध्यक्ष राजेश शेळके, माजी जिल्हाध्यक्ष हेमंत वणजू, सचिव अजय सावंत, जमीर खलफे, मुश्ताक खान, सौरभ मलुष्टे, अमोल मोरे, शकील गवाणकर, प्रणिल पाटील, प्रशांत हरचेकर, केतन पिलणकर, शुभम राऊत, श्रीहरी तांबट, अमोल डोंगरे, समीर शिगवण, अनिकेत जोगळे आदी उपस्थित होते याशिवाय विविध क्षेत्रातील व्यक्तींनी याठिकाणी उपस्थित राहून रक्तदान केले.
मुळात रत्नागिरी मराठी पत्रकार परिषद नेहमी सामाजिक उपक्रम राबवताना सर्वसामान्य लोकांना उपक्रमाचा लाभ देण्याचा प्रयत्न करत असते, शासकीय रुग्णालयात रक्ताची कमतरता असल्याने या रक्तदान शिबीराचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संघमित्रा फुले , डॉ अर्जुन सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले, शासकीय रुग्णालयाच्या ब्लड बँकेच्या सर्व स्टाफनेही खूप सहकार्य करत शिबीर यशस्वीपणे होण्यासाठी सहकार्य केले. गतवर्षीही मराठी पत्रकार परिषदेने रक्तदान शिबीर घेतले होते.