(रत्नागिरी)
शहरालगतच्या नाचणे येथे मिरजोळे बौद्धवाडीतील एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवार 19 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. सम्यक अनंत जाधव (18, मिरजोळे बौद्धवाडी ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, सम्यक हा नाचणे येथे आई, भावासह राहत होता. त्याचे वडील हयात नाहीत. आई महावितरण मध्ये आहे. सम्यक हा आय टी आय करत होता. घरी कोणी नसताना सम्यक याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी 5.30 वाजता आई घरी आली तेव्हा सम्यक हा गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. “रत्नागिरी 24 न्यूज नेटवर्क” मुलाला गळफास घेतलेल्या स्थितीत पाहून आईची बोबडी वळली. ही बातमी समजताच नातेवाईकांनी नाचणे येथे धाव घेतली. पोलिस ही घटनास्थळी दाखल झाले होते.