(रत्नागिरी)
गर्भातील लिंग तपासणी आणि त्यानंतर वाढलेल्या बेकायदेशीर गर्भपातांच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी शासनाने धोरण तयार केले आहे. त्यानुसार सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम राबवण्यात आली. सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रावर आकस्मिक भेटी देण्यात आल्या.
यावेळी अर्जावर रुग्णांची सही, रेकॉर्डची पाहणी करण्यात आली. जिल्हयात 112 सोनोग्राफी सेंटर्स आणि 132 वैद्यकीय गर्भपात केंद्र आहेत. यांच्या तपासणीअंती रत्नागिरी तालुक्यातील 1 व गुहागर तालुक्यातील 1 अशा 2 गर्भपात केंद्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्या दोघांनाही जिल्हा शल्य चिकित्सकांकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दर तीन महिन्याला होणार्या तपासणीमध्ये हे पुढे आले आहे.