(रत्नागिरी)
रत्नागिरीसाठी मेडिकल कॉलेजला केंद्राची मंजुरी मिळाली असल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. यामुळे रत्नागिरीकरांचे अनेक वर्षाचे स्वप्न आता साकार होणार आहे केंद्राने 100 जागांसाठीच्या मेडिकल कॉलेजला मान्यता दिली असून मंजुरी मिळाल्याने आता यावर्षीपासून रत्नागिरीतील मेडिकल कॉलेज सुरू होणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरीत होत असलेल्या मेडिकल कॉलेजमुळे रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी भर पडली आहे. गेले काही वर्ष नाम. उदय सामंत हे रत्नागिरी शैक्षणिक हब निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाने आता रत्नागिरीमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, डी. फार्म, बी. फार्म, एम. फार्म, स्किल सेंटर, ANN महाविद्यालय, GNM महाविद्यालय, मरीन डिप्लोमा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या सर्वांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रत्नागिरी सारख्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार आहे.