जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लँटमधून दररोज 40 जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती सुरू झाली आहे.
कोरोना काळात रुग्णसंख्या वाढतच असल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता भासते.
त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून एक कोटी रुपयांचा ऑक्सिजन प्लँट सुरू करण्यात आला.
याचा फायदा कोरोनाबाधित रुग्णांना होत असून आरोग्य यंत्रणेवरील ताण थोडा कमी झाला आहे.