भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती रत्नागिरीतील गाव-खेड्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष,कार्यकर्ते व समाज बांधवांकडून रत्नागिरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भारतीय बौद्ध महासभा आणि पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी या दोन्हीं संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी येथील भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला 132 व्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी तसेच पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
राज्याचे उद्योगमंत्री , रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी थिबाराजा बुद्धविहार येथे बौद्धजन पंचायत समिती व भारतीय बौद्धमहासभा, रत्नागिरी आयोजित जाहीर धम्म मेळाव्यास उपस्थित राहून अभिवादन केले. यावेळी सभाध्यक्ष प्रकाश पवार, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष वि.बी मोहिते यांनी सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
महामानव,घटनाकार, विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रत्नागिरी जिल्हा कॉग्रेसच्या वतीने काँगेस भवन येथे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना, जिल्हा कॉग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष हारीस शेकासन,सहकार प्रदेश उपाध्यक्ष श्री बंडूशेठ सावंत,शहर अध्यक्ष रमेश शाहा, अनूसूचित जाति जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ आडिवरेकर,शहर उपाध्यक्ष रफिक मुल्ला,शहर सरचिटणीस रवि खेडेकर.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला मानवंदना करताना माजी आमदार बाळ माने व मुलगा मिहीर माने आदी.
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !