(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी गयाळवाडी येथे चोरट्याने घरफोडी करून दागिने व रोख रक्कम असा ३३ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ ते सायंकाळी ६ दरम्यान घडली याप्रकरणी मयर मनोहर दरेकर (गयाळवाडी फाटा, खेडशी) यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे शुक्रवारी सकाळी घर बंद करून कामावर गेले होते. यावेळी घरी येणाऱ्या कामवालीसाठी त्यांनी घराची चावी खिडकीमध्ये ठेवली होती. दरम्यान तक्रारदार हे सायंकाळी ६ वाजता कामातून घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटलेला दिसला. यावेळी त्यांनी घरात प्रवेश केला असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये ४ हजार रूपयांची सोन्याची नथ, १० हजार रूपयांची सोन्याची अंगठी, ५ हजार किमतीची सोन्याची अंगठी, ९ हजार रूपये किमतीचा सोन्याचा कॉईन. ५०० रूपये किमतीचे दोन चांदीचे कॉईन, ४ हजार रूपयांची रोकड असा मुद्देमाल चोरीला गेला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे तपास करत आहेत.