( रत्नागिरी )
सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट प्रकरणी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार भाजपच्या पदाधिकाऱ्याने रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिली आहे. त्यानुसार एका उद्योजकाविरोधात एन. सी दाखल करण्यात आली आहे.
‘सोशल मिडीयावर आमच्याविरुध्द बोलणे बंद कर, नाही तर तुला मी घरात घुसून मारीन’, अशी फोनवरुन धमकी दिल्याबद्दलची तक्रार भाजपाचे योगेश हळदवणेकर (ऱा स्वामी प्रसाद अपार्टमेंट, सन्मित्रनगर, रत्नागिरी) यांनी दिली आहे. ही घटना रविवारी रात्री 9.26 च्या सुमारास घडल़ी
ज्यांनी तक्रार केली आहे ते हळदवणेकर हे भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस पदाची धुरा सांभाळत आहेत. तसेच ते शहरातील पाणी, रस्ते आदी प्रशासकीय कामकाजाबद्दल सोशल मीडियावर वारंवार आपली मत मांडत असतात. व त्या माध्यमातून आपले म्हणणे व समस्या लोकांपर्यंत व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करत असतात. नुकतीच त्यांनी केलेली पोस्ट चर्चचा विषय ठरली आहे.
दरम्यान सोशल मीडियावरील या पोस्ट नंतर रविवारी रात्री 9.26 च्या दरम्यान हळदवणेकर यांना उद्योजक असलेले किरण सामंत (रा. पाली, रत्नागिरी) यांनी मोबाईलवर फोन करुन ‘तू सोशल मिडीयावर आमच्याबद्दल बोलणे बंद कर, नाहीतर तुला मी घरात घुसून मारीन’, अशी धमकी दिली, म्हणून तक्रारदार हळदवणेकर यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे, तसेच तक्रारदार हळदवणेकर यांनी योग्य त्या कोर्टात जावून याबाबत दाद मागण्याची समजही देण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार पाटील करत आहेत.