बॉलिवूड स्टार्सपासून सुरू झालेले डीपफेक व्हिडिओ आता व्यावसायिकांच्या घराघरात पोहोचले आहेत. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आता सध्या रतन टाटा आता डीपफेक चे बळी ठरले आहेत. त्यांचा एक डीपफेक केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रतन टाटा यांनी कंपनीमध्ये गुंतवणूक करून 100 टक्के नफा मिळवू शकतो, असे सांगितले जात आहे. यामध्ये टाटा कंपनीत गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी डीपफेक व्हिडिओ आणि रतन टाटा यांच्या मुलाखतीचा वापर करण्यात आला आहे.
रतन टाटा यांच्याकडे भारतातील लोकांसाठी एक शिफारस असल्याचे पोस्टमध्ये लिहिले आहे. तुमच्याकडे 100% हमीसह आज तुमची गुंतवणूक जोखीममुक्त वाढवण्याची संधी आहे. यासाठी आता चॅनलवर जा. व्हिडीओमध्ये लोकांच्या बँक खात्यांमध्ये नफ्याचा दावा करणारे पैसे जमा होत असल्याचे संदेशही दाखवण्यात आले आहेत. ही पोस्ट व्हायरल होऊन संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. मात्र, रतन टाटा यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
⚠️ FAKE ALERT !!!!
Business Tycoon Ratan Tata Flags #Deepfake Video Of His Interview Recommending Investments.
Video: Shows him with deepfaked voice recommending to join Laila Rao telegram Channel.
The govt needs to take stringent action !!! pic.twitter.com/unu49jUB1i
— 𝗡 𝗢 𝗜 𝗦 𝗘 ⚡ A L E R T S (@NoiseAlerts) December 6, 2023
रतन टाटा हे देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. त्याच्या आधी प्रियांका चोप्रा, रश्मिका मंदान्ना आणि पीएम मोदी यांसारख्या सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.