(रत्नागिरी)
सध्याच्या काळात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे विकसीत होणारे अतिशय वेगवान क्षेत्र आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधी कोणत्या, कोठे आणि आपली पात्रता, तंत्रज्ञानातील बदल स्विकारत स्वत:ला सिध्द केल्यास रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. युवकांनी नोकऱ्या शोधण्यापेक्षा नोकऱ्या देणारे निर्माण झाले पाहिजेत, असे मत युवा उद्योजक गौरांग आगाशे यांनी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस पी हेगशेट्ये महाविद्यालयाच्या सायन्स असोसिएशन तर्फे आयोजित क्विझ आयटी टेकफेस्ट 2023 कार्यक्रमाच्या बक्षिस वितरण प्रसंगी व्यक्त केले. मार्गदर्शनात ते पूढे म्हणाले, आज आयटी बरोबर सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अपरिहार्य होत चालला आहे. कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे बदलत्या परिस्थितीला जुळवून घेत प्रगती करावी. आगाशे यांनी आपला उद्योग आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कसा चालविला जातो या बद्दलचे अनुभव कथीत केले.
क्विझ आयटी टेकफेस्ट कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, सेक्रेटरी परेश पाडगावकर, संचालिका सीमा हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी उपस्थित सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना शुभेच्छा व्यक्त केल्या.
या स्पर्धेत संत राऊळ कॉलेज, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, ए एस पी कॉलेज, एसपी हेगशेट्ये कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील चिपळूण, दापोली, देवरुख, रत्नागिरी, सावंतवाडी, कुडाळ येथील महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत
▪️पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये
प्रथम विप्रा उपळेकर, द्वितीय प्रथमेश अक्कटनरहळ, तृतीय अथर्व चव्हाण
▪️गुगल इट मध्ये
प्रथम निनाद शिंगरे, द्वितीय राहुल खेडेकर, तृतीय आदित्य शिंदे
▪️क्विझ आयटी मध्ये
प्रथम श्रुती घडशी, सानिका शेट्ये, द्वितीय फातिमा तोणदे, मारियनाझ होडेकर, तृतीय पारस चव्हाण, चेतन घडशी
▪️फोटोग्राफी मध्ये
प्रथम महादेव टेमकर, द्वितीय जतिन नाचनकर, तृतीय अमृता निवळकर
▪️स्मार्ट कोडर मध्ये
प्रथम पद्मनाभ भोळे,
द्वितीय सारिक सोलकर तर तृतीय
क्रमांक शिवराज स्वामी
यांनी पटकाविला तर जनरल चॅम्पियन चषक गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने पटकाविला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रिफायर, कॉल आॅफ ड्युटी, सोलो, ड्युअो असे विविध खेळ घेण्यात आले दरम्यानच्या विविध स्पर्धांचे परीक्षण प्रा. अभिजित भाटे, प्रा. सुशील साळवी यांनी केले.