(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दिवाळी साजरी करण्यात आली. प्रथमच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. पेढा भरवून आणि गिफ्ट भेट देऊन शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला. परतीच्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, तसंच खचून जाऊ नये, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलं. नैसर्गिक आपत्तीत सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य शासन तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले, मी आपणा सर्वांना ग्वाही देतो की, तुम्ही धीर सोडू नका, खचू नका, आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, आत्महत्या करून आपल जीवन संपवू नका, हे सरकार सर्वसामान्य लोकांचे आणि शेतकऱ्याचे आहे असे त्यांनी आश्वासन दिले.