(राजापूर)
राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील शिवजयंती उत्सव व कला क्रीडा मंडळ, कसबा मिठगवाणे या मंडळाच्यावतीने मिठगवाणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून वाजत गाजत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या या मिरवणुकीत मीठगवाणे येथील सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते. मिठगवाणे येथील समाज मंदिरामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या उत्सवाचे औचित्य साधत मंडळाच्या वतीने प्रणित उन्हाळेकर चषक नाईट अंडरआर्म क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी प्रणित उन्हाळेकर यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक 5000 आणि भव्य चषक उन्हाळेकर कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आला होता. पंचक्रोशी मर्यादित आणि ओपन अशा दोन गटात खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे 30 ते 35 संघानी सहभाग नोंदविला होता.
पंचक्रोशी विभागातून अणसुरे संघ तर ओपन विभागातून ऑल राजापूर या दोन संघाच्या दरम्यान अंतिम सामना खेळविण्यात आला. अणसुरे संघावर एकतर्फी विजय संपादन करत ऑल राजापूर संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला राजापूर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड आणि मुंबईस्थित मिठगवाणे ग्रामस्थ आणि व्यावसायिक गणेश गडकर यांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि चषक प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष तुषार काजवे, राजा काजवे, संतोष मेस्त्री, आदेश सागवेकर, विशाल काजवे, अमोल कांबळी, सचिन मोहिते, यु. बी. कांबळे, संदीप चव्हाण, महेश कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाच्या सर्व उपक्रमांना मिठगवाने गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ आशा काजवे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच रमेश काजवे, रझाकखान गवाणकर, अंकुश कांबळी, नरेश कांबळी, बलवंत सुतार यांसारख्या जेष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभत असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेस्त्री, उमेश हसन हसोळकर, फिरोज मीर, साहिल कांबळी, किरण काजवे,सचिन मेस्त्री, सचिन चव्हाण, संदीप चव्हाण, शुभम चेऊलकर, तुषार लिंगायत, संतू लिंगायत, अक्षय कणेरी, मंदार कांबळी, संदेश कांबळी, सचिन कांबळी, समीर मेस्त्री, उदय नवलू, सागर पावसकर, श्रीनिवास तारकर, निखिल आडीवरेकर, गंधार राणे, मंसूर गवाणकर यांसह मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.