(रत्नागिरी/वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड भंडारवाडी येथे अवैधरित्या गावठी दारू बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. प्रसाद सदानंद मयेकर (44, मालगुंड भंडारवाडी) असे कारवाई करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालगुंड भंडारवाडी येथे अवैध गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुरूवार 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली असता प्रसाद मयेकर याच्याकडून 9 लिटर गावठी दारू हस्तगत करण्यात आली. जयगड पोलिस ठाण्यात प्रसाद याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.