‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ अंतर्गत केळणे ग्रामपंचायत सदस्या सौ. चेतना चंद्रकांत कदम यांनी ग्रामपंचायतीकडे ३०० मास्क व ३५ लिटर सॅनिटायझर लिक्विड नुकतेच सुपुर्द केले. या उपक्रमात बद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागले आहेत. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत खेड तालुक्यातील केळणे ग्रामपंचायत सदस्या सौ. चेतना कदम यांनी ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने ३०० मास्क व सॅनिटायझर लिक्विड ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केले आहे. यावेळी सरपंच संदीप कदम, सदस्य राजेंद्र कदम, सदस्या सरस्वती गोमले, शर्मिला जँगम, भाग्यश्री गोमले, ग्रामसेवक रवींद्र पत्याणे आदी उपस्थित होते.