( सातारा )
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याच्याराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, यावर बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केलाय. राज्यात कायदा शिल्लक राहिला आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
अत्याचाराचा गुन्हा करणारे धनधांडगे पैशाच्या जोरावर वकील पोलिस खरेदी करतात, त्यामुळे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे. बाहेरच्या देशात कायदे कडक आहेत आपल्याकडे सुध्दा तसे कडक कायदे करा असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले, चोरी करणाऱ्यांची बोटं छाटली जातील तर बलात्कार करणाऱ्यांचे काहीही छाटा. एका बाजूला आपण स्त्री म्हणजे आदिशक्ती म्हणतो पण त्यांना जपण्याचं काम तरी आपण केलं पाहिजे, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीबाबतचा मुद्दा मी लावून धरला नाही तर तो केव्हाच बाजूला पडला असता, उशिरा का होईला आता लोकं एकत्र येत आहे, ही चांगली गोष्ट आहे असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.