महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये सुरक्षा रक्षक पदाची भरती प्रक्रिया चालू करावयाची असल्याने जाहिरातीत नमूद केल्यानुसार पात्रता पडताळणी व मैदानी चाचणीच्या तारखा जाहीर केल्या गेल्या आहेत. याबाबत जे उमेदवारी MSF भरतीसाठी पात्र आहेत त्यांची यादी जिल्ह्यानुसार खाली दिली आहे.
महामंडळाने संदर्भ क्र. ०१ अन्वये ७००० सुरक्षा रक्षक भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यानुसार मार्च – एप्रिल २०२० या दरम्यान मुंबई व नागपूर अशा दोन ठिकाणी भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते. सदरची भरती प्रक्रिया दि. २०.०८.२०२२ पासून खालील नमूद राज्य राखीव पोलीस बल गट या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे.
१. सदर भरती प्रक्रिया ही मुळ जाहिरातीमधील अटी व शर्तीनुसार त्याचप्रमाणे वयाचा निकष यासाठी जाहिरातीमध्ये नमुद करण्यात आलेली दिनांक आधारभूत धरली जाणार आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक केंद्रावर १५०० उमेदवार बोलाविण्यात येणार आहेत.
२. जाहिरातीमधील नमुद किमान निकष पूर्ण करणारे व भरती शुल्क महामंडळाकडे जमा केलेले उमेदवार यांना सदर भरतीप्रक्रियेसाठी बोलाविण्यात येणार आहे.
४. उमदेवारांना ठरवून दिलेल्या दिनांकास भरतीसाठी हजर होणे काही अपरिहार्य कारणास्तव शक्य न झाल्यास, त्यांना त्यानंतर पुढील ०३ दिवसात संबधीत भरती केंद्रावर हजर राहता येईल.
५. प्रत्येक उमेदवारांनी भरतीवेळी येताना ऑनलाईन अर्जाची छायांकित प्रत, अर्ज शुल्क भरणा केलेली पावती, ०२ फोटो, शैक्षणिक मुळ कागदपत्रे व त्यांची झेरॉक्स प्रत सोबत आणावी.