(चिपळूण / ओंकार रेळेकर)
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शिंदेशाही इतिहास प्रसार प्रचार संशोधन प्रकाशन आणि संवर्धन हा ऐतिहासिक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कार्यरत असणाऱ्या श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष(कोकण विभाग) पदी चिपळूण दसपटी विभागातून प्रथम शिंदे यांची निवड झाली आहे. राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते व जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज इतिहास अभ्यासक घनश्याम ढाने यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सुहास शिंदे, कार्याध्यक्ष संभाजीराव शिंदे, उपाध्यक्ष अविनाश शिंदे, सचिव दीपक शिंदे, राज्य संघटक राजेश शिंदे यांच्यासह प्रतिष्ठानचे राज्य व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात वडगाव जयराम स्वामी या ठिकाणी शिंदेशाही इतिहास जागृती अभियान संपन्न झाले. यावेळी प्रतिष्ठान च्या वतीने 1942 च्या चले जाव आंदोलनातील हुतात्म्यांच्या स्मृती स्तंभास अभिवादन करण्यात करण्यात आले. त्याचबरोबर इतिहास अभ्यासक घनश्याम ढाने यांनी शिंदे सरकार घराण्यातील 250 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक अस्सल पत्रव्यवहाराचे वाचन यावेळी केले.
शिंदे सरकार घराणे आणि मुख्यत्वे श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार यांनी गाजवलेला इतिहास प्रसार प्रचार संशोधन प्रकाशन आणि संवर्धन या विषयावर गेल्या 15 वर्षापासून प्रतिष्ठान चे कार्य सुरू असून प्रतिष्ठानने चिपळूण येथील प्रथम शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची राज्य उपाध्यक्ष (कोकण विभाग)पदी नियुक्ती केली आहे. यावेळी प्रतिष्ठान चे मयुरेश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रतापराव शिंदे, प्रमोद शिंदे, अमर शिंदे, सागर शिंदे, केदार शिंदे, किरण शिंदे, सुधाकर शिंदे, बाळासाहेब शिंदे, प्रदीप शिंदे, विशाल शिंदे, विश्वजित शिंदे व महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील शिंदे सरकार बंधू उपस्थित होते. प्रथम शिंदे यांच्या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
फोटो : आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते व जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज इतिहास अभ्यासक घनश्याम ढाने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमेश शिंदे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुहास शिंदे, कार्याध्यक्ष संभाजीराव शिंदे, उपाध्यक्ष अविनाश शिंदे, सचिव दीपक शिंदे, राज्य संघटक राजेश शिंदे यांच्यासह प्रतिष्ठान चे राज्य व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते (छाया : ओंकार रेळेकर)