(गणपतीपुळे / वैभव पवार)
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने कवी केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय समिती, व्यवस्थापन समिती व कोमसाप – शाखा, मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारक येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास राणे यांनी केले. तसेच अध्यक्षीय भाषण करताना रवींद्र मेहेंदळे यांनी ग्रंथांचे महत्त्व अधोरेखित केले.
वाचन संस्कृती मोठ्या प्रमाणावर जोपासावी असे आवाहन उपस्थितांना केले. शेवटी मेहेंदळे यांनी स्वरचित नांदी सादर केली. यावेळी कोमसाप मालगुंड शाखेच्या सदस्या उज्वला बापट यांनी आपली मराठी मायबोली ग्रंथ रूपाने साता समुद्रापार पोहचल्याबद्दल आपले अनुभव कथन करून आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमाला कोमसाप स्मारक सदस्य, कोमसाप शाखा मालगुंडचे सदस्य, स्मारक कर्मचारी व वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप कोमसाप मालगुंड शाखेचे सचिव विलास राणे यांनी केला. सदर ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ ग्रंथालयाचे वाचक व पर्यटक यांनी घेतला.