(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय डॉ.नानासाहेब मयेकर फाऊंडेशन पुरस्कृत कै. शिरीष मुरारी मयेकर इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन शिबीर कोल्हापूर येथील तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाने यशस्वीपणे पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये खंड पडला असल्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वात अवघड असणारा इंग्रजी विषय सोपा करण्यासाठी महाविद्यालयाने इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन शिबीराचे आयोजित करून परीक्षेला सामोरे जाताना कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात ?ते कसे सोडवावेत? त्याची उजळणी कशी करावी? याचे मार्गदर्शन सोप्या पद्धतीने करण्यात आले. या विशेष शिबीराला परिसरातील ज्युनिअर कॉलेजमधील सुमारे ३०० विद्यार्थी उपस्थित होते.
कोल्हापूर येथील प्राध्या.उमेश अपराध, प्राध्या.बृहस्पती शिंदे, प्राध्या. विकास माने, प्रा.आसिफ कोतवाल यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे प्रभावी मार्गदर्शन केले. मोहिनी मुरारी मयेकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सुनिल मयेकर यांनी विद्यार्थ्यांना या शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अभ्यासात सातत्य ठेवा आणि यशवंत व्हा असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष सुनिल मयेकर, उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, सचिव रोहित मयेकर, संस्थेचे संचालक सुरेंद्र माचिवले महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या स्नेहा पालये, उपप्राचार्य गणेश कुळकर्णी, श्री.उमेश अपराध,श्री. बृहस्पती शिंदे, श्री. विकास माने, श्री. आसिफ कोतवाल, श्री. विनायक राऊत, श्री.किशोर पाटील, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.